मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने भारतात आपला नवीन स्मार्टफोन क्लाउड स्विफ्ट लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ८,८८८ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडीलवर उपलब्ध आहे. त्यासाठी स्नॅपडीलवर आजपासूनच रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे आणि २० ऑक्टोबरपासून हा विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १२८०x७२० पिक्सेल आहे. त्यासोबतच हा स्मार्टफोन १.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि ३जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने आपण १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्यात २५००mAh ची बॅटरीसुद्धा दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा ७ ते ८ तास टॉकटाईम आणि ४००-५०० तास स्टॅडबाय टाईम देण्यास सक्षम आहे.
ह्याच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE, ब्लूटुथ आणि वाय-फाय दिले गेले आहे. त्याचबरोबर हा फोन हिंदीसह २१ प्रादेशिक भाषांना सपोर्ट करण्यास सक्षम आहे.