ह्यात 5 इंचाची डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची ppi 294 पिक्सेल आहे. हा फोन 1.3GHz क्वाड-कोर स्प्रेडट्राम SC9832 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 1GB रॅमसुद्धा दिली आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी इंटेक्सने भारतीय बाजारात आपला नवीन फोन क्लाउड स्ट्रिंग HD लाँच केला आहे. कंपनीने बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत ५,५९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर काळ्या आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे.
इंटेक्स क्लाउड स्ट्रिंग HD मध्ये ५ इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची ppi 294 पिक्सेल आहे. हा फोन 1.3GHz क्वाड-कोर स्प्रेडट्राम SC9832A प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 1GB ची रॅम सुद्धा दिली आहे. फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
हा फोन अॅनड्रॉईड 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि ह्यात 2200mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. हा फोन केवळ 144.50×72.50×8.70 आहे. ह्याचे वजन 150 ग्रॅम आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात वायफाय, GPS, ब्लूटुथ, FM, 3G, 4G सारखे कनेक्टिव्हिटी पर्यायसुद्धा दिले आहेत.