मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने बाजारात आपला नवीन फोन क्लाउड ज्वेल सादर केला आहे. कंपनीने बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत ५,९९९ रुपये ठेवली आहे. हा फोन विशेषकरुन ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. ह्या फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
ह्या फोनमध्ये क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे,ह्याचे स्टोरेज 32GB च्या मायक्रोएसडी कार्डने वाढवू शकतो.
त्याशिवाय फोनमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये 4G, LTE, 3G, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्स दिले गेले आहे.
हेदेखील वाचा – सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचचे तीन नवीन व्हर्जन भारतात लाँच
हेदेखील वाचा – ६ एप्रिलला लाँच होऊ शकतो मिजू M3 नोट स्मार्टफोन