मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन क्लाउड 4G स्मार्ट लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ४,९९९ रुपये ठेवली आहे.आण ह्यात एक्सक्लुसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
जर ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची FWVGA TFT डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. जे मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
तसेच इंटेक्स क्लाउड 4G स्मार्ट स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलेचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.
हा स्मार्टफोन 2000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा स्मार्टफोन 6 तासांचा टॉकटाइम आणि 150 तासांचा स्टँडबाय टाइम देईल. ह्या स्मार्टफोनचे डायमेंशन 144.4×73.2×9.75mm आणि ह्याचे वजन 156 ग्रॅम आहे.
हा 4G स्मार्टफोन हायब्रिड सिम स्लॉटने सुसज्ज आहे. याचाच अर्थ असा की, यूजर एकाच वेळी दोन्ही सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि मायक्रो-एसडी कार्डचा वापर करु शकेल. ह्या स्मार्टफोनवर मातृभाषा, इंटेक्स सर्विस, ओपेरा मिनी, क्लीन मास्टर, न्यूजहंट, मिंत्रा आणि चॅट्स सारखे अॅप आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असतील. हा काळा, पांढरा आणि शॅम्पेन रंगात मिळेल.