मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स क्लाउड 3G कँडी आणि क्लाउड 3G जेम सादर केला आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे. त्याचबरोबर ह्याच्या किंमतीविषयीही माहिती देण्यात आली आहे. ह्यांची किंमत क्रमश: २९९९ रुपये आणि ३,५९९ रुपये आहे. दोन्हीही इंटेक्स स्मार्टफोन आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड 4.4.2 किटकॅटवर काम करतात.ह्यात ड्यूल सिम सपोर्ट आहे.
इंटेक्स क्लाउड 3G कँडी स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×800 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1GHz सिंगल-कोर स्प्रेडट्रम प्रोसेसर, SC7715 चिपसेट आणि 256MB रॅमने सुसज्ज आहे. ह्याला मायक्रो-एसडी कार्डचे दोन स्लॉट दिले आहे आणि ह्याचे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 2 मेगापिक्सेलचा रियर आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 1400mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्याचे परिमाण 122.5×63.3×10.1mm आहे.
इंटेक्स क्लाउड 3G जेम स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×800 पिक्सेल आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1GHz सिंगल कोर स्प्रेडट्रम प्रोसेसर, MC7731G आणि 512MB ची रॅम दिली आहे. ह्यात 2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्यात मायक्रो-एसडी कार्ड स्लॉटसुद्धा आहेत आणि ह्याचे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा 1400mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्याचे परिमाण 125×63.3x10mm आहे.
दोन्ही स्मार्टफोन एक 3G सिम आणि एक 2G सिमला सपोर्ट करतो. इतर कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, मायक्रो-USB, वायफाय आणि GPRS/एज यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक, शॅम्पेन आणि चंदेरी रंगात उपलब्ध होतील.