मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने आपला नवीन स्मार्टफोन क्लाउज चॅम्प लाँच केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या साइटवर लिस्ट केले गेले आहे. ह्याची किंमत ३,९९९ रुपये आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.5 इंचाची FWVGA TFT डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1GHz ड्यूल कोर मिडियाटेक MT6572X प्रोसेसर आणि 512 MB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 4GB चे अंतर्गत स्टोरेज दिलेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येते.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. इंटेक्स क्लाउड चॅम्प एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड 4.4.2 किटकॅटवर काम करतो. ह्यात 1700mAh ची बॅटरी आहे. कंपनीनुसार, हँडसेटची बॅटरी ७ तासांपर्यंतचा टॉकटाइम आणि २९८ तासांचा स्टँडबाय वेळ देते.
ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, वायफाय, ब्लूटुथ, मायक्रो-यूएसबी आणि GPS कनेक्टिव्हिटी आहे. ह्याचे परिमाण 136×67.5×8.7mm आहे.