इंटेक्स अॅक्वा यंग स्मार्टफोन लाँच,किंमत ५१०० रुपये

इंटेक्स अॅक्वा यंग स्मार्टफोन लाँच,किंमत ५१०० रुपये
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन १.३GHz क्वाड-कोर स्पेडट्रम(SC7731) प्रोसेसर आणि १जीबी रॅमने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ज्याला मायक्रो-SD कार्डने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.

मोबाईल निर्माता कपंनी इंटेक्सनेने आपला नवीन स्मार्टफोन अॅक्वा यंग लाँच केला आहे. ह्याची किंमत ५,०९० रुपये ठेवण्यात आलीय, ह्या कंपनीने अधिकृत वेबसाइटवर ह्याला लिस्ट केले आहे. हा बाजारात लवकरच उपलब्ध होईल.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची FWVGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. तसेच स्क्रिन कोर्निंग गोरिला ग्लासने संरक्षित करण्यात आली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर स्पेडट्रम(SC7731)  प्रोसेसर आणि १जीबी रॅमने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ज्याला मायक्रो-SD कार्डने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.

त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. इंटेक्स अॅक्वा यंग एक ड्युलसिम स्मार्टफोन आहे जो आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर चालतो. स्मार्टफोनमध्ये २५००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. यादीत म्हटल्याप्रमाणे हा १० तासांपर्यंत टॉकटाईम आणि २५० तासांपर्यंत स्टँडबाय टाईम देतो.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, GPRS/एज, GPS, वायफाय 802.11 B/G/N, मायक्रो-USB आणि ब्लूटुथ वैशिष्ट्य आहे.  ह्याचे परिमाण १४३.३x७२x९.५mm आहे. ह्याचे वजन १५८ ग्रॅम आहे. ह्या स्मार्टफोनला शँपेन, डार्क ग्रे आणि व्हाइट रंगात लिस्ट केले गेले आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo