इंटेक्सने मंगळवारी आपला अजून एक स्मार्टफोन लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत 10,390 रुपये ठरविण्यात आली आहे. हा आपल्याला ब्लॅक, शॅम्पेन, ग्रे आणि व्हाइट अशा ४ रंगात उपलब्ध होईल. ह्याला आपण पुढील आठवड्यापासून खरेदी करु शकता.
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात ५ इंचाची HD 720×1280 पिक्सेल डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याची पिक्सेल तीव्रता जवळपास 293ppi आहे. ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये 1GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735p प्रोसेसर दिला गेला आहे.
फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग दिला गेला आहे. ह्या कॅमे-याच्या फिचर्समध्ये फेज डिटेक्शन, ऑटो सीन डिटेक्शन, सेल्फ टायमर, स्माइल डिटेक्शन, फेस ब्यूटी, लाइव फोटो, पॅनोरमा आणि अजून बरेच काही दिले गेले आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच कनेक्टिव्हिटी पर्यायासाठी 4G, 3G, वायफाय 802.11b/g/n, ब्लूटुथ, मायक्रो युएसबी, GPS/A-GPS आणि 3.5mm चा ऑडियो जॅक दिला गेला आहे.
स्मार्टफोनमध्ये 2150mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे, जी कंपनीनुसार ६ तास टॉक टाईम देईल आणि २५० तास स्टँडबाय वेळ देईल. स्मार्टफोनमध्ये आपल्याला अनेक सेंसर मिळत आहेत. त्याशिवाय कंपनी ह्या स्मार्टफोनसोबत 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा देत आहे. आणि त्याचबरोबर कॉम्प्लिमेंटरी बॅग पॅकसुद्धा देत आहे.