ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हे दोन्ही कॅमेरे LED फ्लॅशने सुसज्ज आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी इंटेक्सने भारतीय बाजारात आपला नवीन फोन अॅक्वा शाइन 4G लाँच केला आहे. कंपनीने भारतात आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ७,६९९ रुपये ठेवली आहे. सध्यातरी ह्या फोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे. तरीही हा स्मार्टफोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल, ह्याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हे दोन्ही कॅमेरे LED फ्लॅशने सुसज्ज आहे.
फोनमध्ये क्वाड-कोर मिडियाटेक MT6735V प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहेत, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. ह्या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा 4G LTE सपोर्ट करतो. ह्या फोनमध्ये VoLTE सपोर्टसुद्धा देण्यात आले आहे.