VoLTE सपोर्टने सुसज्ज आहे इंटेक्स अॅक्वा सिक्युअर स्मार्टफोन
ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे आणि हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन अॅक्वा सिक्युर लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे आणि हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. ह्या फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्टोर्सवर उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन मॅट फिनिशसह लाँच केला गेला आहे. हा सोनेरी आणि राखाडी रंगात मिळेल. ह्यात VoLTE सपोर्टसुद्धा दिला गेला आहे.
इंटेक्स अॅक्वा सिक्यूअर स्मार्टफोन 4.5 इंचाची FWVGA डिस्प्लेने सुसज्ज आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1GHz क्वा़ड-कोर मिडियाटेक MT6735M प्रोसेसर आणि 1GB ची रॅम आहे. हा स्मार्टफोन 8GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येतो, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवूही शकतो.
हेदेखील वाचा – कसा आहे मोटो G4 प्लस स्मार्टफोन, जाणून घ्या ह्या चित्रांच्या माध्यमातून..
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा रियर कॅमेरा ड्यूल-LED फ्लॅशने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. फोनमध्ये 1900mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी GPRS/EDGE, 3G, GPS, ब्लूटुथ, वायफाय आणि मायक्रो-USB सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – पुन्हा एकदा बाजारात होणार नोकिया फोन्स आणि टॅबलेट्सची धमाकेदार एन्ट्री
हेदेखील वाचा – 6000mAH क्षमता असलेला हा आहे झोलोचा सुपर स्लिम X060 पॉवर बँक, किंमत ९९९ रुपये