हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC7731 चिपसेट आणि 512MB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB वाढवता येऊ शकते.
मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने आपला नवीन स्मार्टफोन अॅक्वा Q7 आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केला आहे. ह्या स्मार्टफोनला किंमतीसहित लिस्ट केले गेले आहे. ह्याची किंमत ३,७७७ रुपये ठेवण्यात आली आहे. असे सांगितले जातय की, कंपनी ह्याला लवकरच बाजारात लाँच करेल.
जर इंटेक्स अॅक्वा Q7 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ४.५ इंचाची FWVGA डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्याची पिक्सेल डेनसिटी 320ppi आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC7731 चिपसेट आणि 512MB ची रॅम देण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
हा स्मार्टफोन २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 2000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G(HSPA+), वायफाय ८०२.११ B/G/N, ब्लूटुथ, मायक्रो-USB, GPS/A-GPS आणि ३.५ मिलीमीटर ऑडियो जॅक वैशिष्ट्य दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 135x66x9.5mm आहे. स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसरसुद्धा देण्यात आला आहे.