इंटेक्स अॅक्वा पॉवर 4G स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलोने सुसज्ज
ह्यात आहे 1GB रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाइल डिवायसेस निर्माता कंपनी इंटेक्सने आपला एक नवीन स्मार्टफोन अॅक्वा पॉवर 4G आपल्या अधिकृत साइटवर लिस्ट केला आहे. वेबसाइटवर ह्या फोनची किंमत ६,६९० रुपये दिली आहे. हा फोन चॅम्प गोल्ड आणि डिप ब्लू रंगात उपलब्ध होईल. तथापि, वेबसाइटवर ह्या स्मार्टफोनच्या उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची डिस्प्ले असले. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल असेल. ह्यात 1.0GHz क्वाड-कोर मिडियाटेक (MT6735P) प्रोसेसर असेल. हा माली-T720 GPU सह आला आहे.
हेदखील पाहा – झटपट पाहा, शाओमी mi मॅक्स स्मार्टफोनची एक झलक..
ह्यात 1GB ची रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सेलच्या ऑटो-फोकस रियर कॅमे-याने सुसज्ज आहे. फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅशसह येतो. फ्रंट कॅमे-यासह सिंगल LED फ्लॅशसुद्धा दिला आहे.
हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
हा स्मार्टफोन 3800mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 18 तासांचा टॉक टाइम देतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
ह्यात 4G, ब्लूटुथ, वायफाय, USB 2.0 पोर्ट, GPS/AGPS सारखे फीचर्ससुद्धा आहेत. ह्याचा आकार 145.4×72.7×8.99mm आणि वजन 160 ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
हेदेखील वाचा – एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज