Intex ने आपल्या Aqua Lions सीरीज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे, मागच्या महिन्यात Aqua Lions T1 च्या लॉन्च नंतर Intex ने Lions E3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा नवीन स्मार्टफोन ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येत आहे आणि याची किंमत 5,499 रुपये आहे.
या स्मार्टफोन ची विक्री पुजारा टेलीकॉम सोबत एक्सक्लूसिव पार्टनरशिप मध्ये करण्यात येत आहे. हा हँडसेट विशेषकरून सौराष्ट्र मधील पुजारा टेलीकॉम च्या 40 आउटलेट वर सेल साठी उपलब्ध केला जाईल.
Intex Aqua Lions E3 स्मार्टफोन रिलायंस जियो च्या 2,200 कॅशबॅक ऑफर सह येतो. या ऑफर चा फायदा घेण्यासाठी कस्टमर्स ला Lions E3 मधील आपल्या जियो सिम ला 198 किंवा 299 रुपयांच्या प्लान ने रिचार्ज करावे लागेल, त्यानंतर त्यांना माय जियो अॅप मध्ये 50 रुपयांचे 44 कॅशबॅक वाउचर मिळतील. हे वाउचर पुढील रिचार्ज करण्यासाठी वापरता (रिडीम) येतील.
Intex Aqua Lions E3 स्मार्टफोन मध्ये 5 इंचाचा HD डिस्प्ले आहे. हा डिवाइस 1.3GHz क्वॉड कोर प्रोसेसर वर चालतो. हा 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज सह येतो, जी माइक्रो एसडी कार्ड ने वाढवता येते. कॅमेरा पाहता हा फोन ऑटोफोकस आणि LED फ्लॅश सह 8 मेगापिक्सल च्या कॅमेरा सह येतो, सेल्फी आणि विडियो कॉलिंग साठी यात 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.
हा स्मार्टफोन एंड्रॉयड 7.0 नौगट वर चालतो आणि हा 2,500mAh च्या बॅटरी सह येतो. Intex चा दावा आहे की या हँडसेट ची बॅटरी 5-6 तासांचा टॉक टाइम आणि 7-8 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते. कनेक्टिविटी साठी हा फोन 4G VoLTE, ब्लूटूथ, Wi-Fi आणि GPS सपोर्टिव आहे.