मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने MWC २०१६ मध्ये आपला नवीन स्मार्टफोन अॅक्वा फिश लाँच केला. हा स्मार्टफोन सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 वर काम करतो.
ताज्या बातमीनुसार, इंटेक्स अॅक्वा फिश स्मार्टफोन भारतात एप्रिलमध्ये सादर होईल. फिटएनहिटनुसार स्मार्टफोनला जवळपास 7,000 किंमतीत लाँच केले जाऊ शकते.
जर इंटेक्स अॅक्वा फिश स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD TFT डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या लेटेस्ट सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 आधारित ह्या फोनमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा ड्यूल-सिम सपोर्ट येतो.
इंटेक्स सेलफिश ओएस 2.0 ला लायसेंस देणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे. ह्या ऑपरेटिंग सिस्टमवर अॅनड्रॉईड अॅप्लिकेशनसुद्धा चालू शकते.
हेदेखील वाचा – शाओमी Mi5 : बहुप्रतिक्षित असा शाओमी Mi5 आहे स्नॅपड्रॅगन 820 ने सुसज्ज
हेदेखील वाचा – सोनी अल्फा NEX-3NL मिररलेस आणि कॅनन EOS-M मिररलेस यांची तुलना