मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने बाजारात आपला नवीन फोन अॅक्वा क्लासिक लाँच केला आहे. हा फोन 3G सपोर्टसह येतो. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ४,४४४ रुपये ठेवली आहे. कंपनीने ह्या फोनला आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे.
इंटेक्स अॅक्वा क्लासिक एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची डिस्प्ले देण्यात आहे. ही डिस्प्ले गोरिला ग्लास 3 ने सुसज्ज आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. हा फोन 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ह्यात 1GB रॅम देण्यात आली आहे. हा फोन 8GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – काय मिळतय विराट फॅनबॉक्सच्या आत? पाहा आमच्या नजरेतून…
इंटेक्स अॅक्वा क्लासिक स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ, GPS सारखे फीचर्ससुद्धा आहेत. ह्यात 2100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
हेेदेखील वाचा – २९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
हेेदेखील वाचा – स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये