मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने आपला नवीन स्मार्टफोन एक्वा एयर लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ४,६९० रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. सध्यातरी ह्याच्या उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. हा एक IPS डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz ड्यूल कोर मिडियाटेक एमटीके6572 डब्ल्यू प्रोसेसर आणि 512MB रॅमने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी ह्यात माली 400MP GPU आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येते.
त्याचबरोबर हा स्मार्टफोन LED फ्लॅशसह २ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेल फ्रंट कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2300mAh ची बॅटरी दिली गेला आहे. कंपनीनुसार ही बॅटरी साडे आठ तास टॉकटाईंम आणि ३०० तास स्टँडबाय वेळ देते.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी GPRS/एज, 3G, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटथ V4.0, मायक्रो-USB 2.0 आणि GPS/ A-GPS आहे. अॅक्वा एयरमध्ये एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि एंबियंट लाइट सेंसर दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 145×72.8x10mm आहे. आणि ह्याचे वजन १५१ ग्रॅम आहे. स्मार्टफोनला काळ्या, शॅम्पेन आणि पांढ-या रंगात लिस्ट केले गेले आहे.