इंटेक्सने मागील आठवड्यात भारतात आपला क्लाउड 4G स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आपला नवीन स्मार्टफोन इंटेक्स अॅक्वा एयर II भारतात लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा आकर्षक डिस्प्ले दिली गेली आहे.
मागील आठवड्यात भारतात आपला क्लाउड 4G स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन इंटेक्स अॅक्वा एयर II भारतात लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची आकर्षक डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ४,६९० रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात मिळणे सुरु होईल.
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 4.4 किटकॅटवर चालतो. त्याचबरोबर ह्यात 5 इंचाची FWVGA 480×854 पिक्सेलची TFT डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याला गोरिल्ला ग्लासने सुरक्षा प्रदान केली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.2GHz ड्यूल कोर मिडियाटेक MT6572W प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोमध्ये 1GB ची रॅम दिली गेली आहे.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 2MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 0.3MP फ्रंट फेसिंग कॅमे-यासह दिला आहे. फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतोे. फोनमध्ये 2300mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. जी कंपनीनुसार 3G वर ४ तासांचा टॉकटाइम आणि 2G वर 6 तासांचा टॉकटाइम देण्यास सक्षम आहे. हा स्मार्टफोन आपल्याला राखाडी रंगात मिळेल.
ह्याआधी कंपनीने आपला स्मार्टफोन क्लाउड 4G स्मार्ट सादर केला होता. जर इंटेक्स क्लाउड 4G स्मार्ट स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची FWVGA TFT डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.