मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन इंटेक्स अॅक्वा एस II लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये ठेवली आहे. कंपनीने ह्याआधी ह्या स्मार्टफोनला आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले आणि त्यानंतर काही वेळातच ह्याला लाँचसुद्धा केले.
इंटेक्स अॅक्वा एस II स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 V/W प्रोसेसर आणि 3GB DDR3 रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला 32GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर इंटेक्स अॅक्वा एस II स्मार्टफोनमध्ये 4P लेन्स, F/2.0 अॅपर्चर आणि ड्यूल LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि f/2.4 अॅपर्चरसह 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. इंटेक्स अॅक्वा एस II ड्यूल सिम सपोर्ट करतो आणि हा 5.1 अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो.
कनेक्टिव्हिटीसाठी इंटेक्स अॅक्वा एस II स्मार्टफोनमध्ये वायफाय, ब्लूटुथ, 4G, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB फीचर्स दिले गेले आहे. फोनचे डायमेंशन 145.3x72x8.65mm आणि वजन 149 ग्रॅम आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – फेसबुक मेसेंजरमध्ये लपला आहे एक गुप्त गेम
हेदेखील वाचा – अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स