इनेलो ने नॉच डिस्प्ले सह आपला पहिला स्मार्टफोन सादर केला

इनेलो ने नॉच डिस्प्ले सह आपला पहिला स्मार्टफोन सादर केला
HIGHLIGHTS

इनेलो 1 ची एक-एक विशेषता आज जगभरातील लाखो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. हा मोबाईल मजबूत पण तेवढाच हलका आहे. याची कॉम्पॅक्ट बिल्ड आणि 2.5डी कव्र्ड ग्लास याला प्रीमियम लुक देते आणि हा एकाच हातात धरून वापरता येतो, तेही अगदी सहज.

नवीन कल्पनांचा लाभ प्रत्येकासाठी’ या सिद्धांताचे पालन करत प्रीमियम इलेक्ट्रॉनिक कंपनी इनेलो ने आज आपला पहिला स्मार्टफोन इनेलो 1 सादर केला. आठ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणार्‍या डिवाइसेज मध्ये इनेलो 1 पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात नॉच डिस्प्ले फीचर पण आहे. या स्मार्टफोन मध्ये 19:9 रेशियो असलेला 5.86 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. फक्त 7,499 रुपयांच्या अविश्वसनीय किंमतीत इनेलो 1 अमेजॉन वर 18 सप्टेंबर 2018 पासून एक्सक्लूसिवली उपलब्ध आहे. कंपनीला आईवूमी कडून मदत मिळाली आहे. 

इनेलो 1 ची एक-एक विशेषता आज जगभरातील लाखो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. हा मोबाईल मजबूत पण तेवढाच हलका आहे. याची कॉम्पॅक्ट बिल्ड आणि 2.5डी कव्र्ड ग्लास याला प्रीमियम लुक देते आणि हा एकाच हातात धरून वापरता येतो, तेही अगदी सहज. स्मार्टफोन ची कव्र्ड डिजाइन याच्या फुलव्यू डिस्प्ले ला अधिक सुस्पष्ट करते आणि 1520×720 पिक्सेल च्या रिजोल्यूशन मुळे यूजर्सना फोटो किंवा वीडियो बघण्याचा शानदार अनुभव मिळतो. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी या स्मार्टफोन मध्ये 5पी लेंस, सॅमसंग सेंसर सह 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा यात आहे आणि यातील सॉफ्ट फ्लॅश मुळे कमी प्रकाशात पण चांगली फोटोग्राफी करता येते. तसेच, फ्रंट पॅनल वरील कॅमेरा मध्ये 4पी लेंस सह 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फोन मध्ये कॅमेरा संबधीत अजून फीचर्स आहेत, ज्यात पोट्र्रेट मोड, टाइम लॅप्स, 6 लेवल ब्यूटी मोड, फेस क्यूट इत्यादींचा समावेश आहे. 

जागतिक बाजारात आपल्या खास उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली इनेलो ही कंपनी आकर्षक किंमतीत ट्रेंड वर आधारित टेक्नोलॉजी च्या माध्यमातून भारतात आपली ओळख निर्माण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. इनेलो 1 पहिला असा प्रोडक्ट आहे जो पूर्णपणे कंपनीच्या सिद्धांतावर आधारित आहे. बाजारात पाऊल ठेवण्याच्या तयारी सह इनेलो ने आपल्या पहिल्याच वर्षात 100 लाख डॉलर गुंतविण्याची योजना बनवली आहे. 
या लाँचिंगच्या वेळी इनेलो इंडिया चे सीईओ अश्विन भंडारी म्हणाले, “कंपनी स्पर्धेतील नवनवीन उच्चांक गाठत आहे आणि त्याचबरोबर स्वस्तात सर्वोत्तम टेक्नोलॉजी सादर करणे आमची मोहीम बनली आहे. इनेलो 1 आशा अत्याधुनिक टेक्नोलॉजी सह अत्यंत काळजीपूर्वक डिजाइन करण्यात आला आहे जो शहरी आणि युवा यूजर्सच्या अपेक्षा पूर्ण करतो. हा ग्राहकांना पुर्णपणे एका हाई-एंड स्मार्टफोन सारखा अनुभव देतो.” 

ते पुढे म्हणाले, “इनेलो च्या माध्यमातून आम्ही तीच टेक्नोलॉजी देत आहोत जी सध्या मिड रेंज (20,000 ते 25,000) मधील फोन मध्ये दिली जाते पण आम्ही इथे 7,000 ते 13,000 रुपयांमध्ये ग्राहकांना ते सर्व देत आहोत. कारण आमचे ध्येय प्रत्येकापर्यंत नवकल्पना पोहोचविण्याचे आहे.” 

स्मार्टफोन मधील फ्रंट कॅमेर्‍याच्या मदतीने डिवाइस अनलॉक करण्यासाठी फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेयर देण्यात आले आहे आणि याच्या अतिरिक्त सुरक्षेसाठी याच्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. स्मार्टफोन 3000 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हा स्मार्टमी ओएस 3.0 वर चालतो जो एंड्रायड 8.1 ओरियो वर आधारित आहे, ज्यात 1.3 गीगाहट्र्ज एमकेटी क्वॉड कोर प्रोसेसर आहे. 2 जीबी रॅम आणि 16जीबी रोम असलेल्या या फोनची मेमरी माइक्रो एसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत एक्सपांड करता येते. हा स्मार्टफोन चार वाइब्रेंट कलर मध्ये उपलब्ध आहे- पर्शियल रेड, पॅसिफिक ब्लू, प्लॅटिनम गोल्ड आणि मिडनाइट ब्लॅक. 
इनेलो 1 डुएल सिम आधारित स्मार्टफोन आहे ज्यात वाई-फाई, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी, 3जी आणि 4जी (भारतातील काही एलटीई नेटवक्र्स द्वारा वापरल्या जाणार्‍या बँड 40 च्या सपोर्ट सह) सारखे इतर कनेक्टिविटी चे पर्याय उपलब्ध आहेत. या डिवाइसची एसेंबलिंग आणि पॅकेजिंग भारतात करण्यात आली आहे. याच्या विक्री नंतर याला देशातील 500 पेक्षा जास्त सर्विस सेंटर्स कडून सर्विस सपोर्ट मिळेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo