iPhone 14 Plus पेक्षा कमी किमतीत iPhone 15 Plus लाँच होण्याची शक्यता
असे मानले जाते की, iPhone 14 Plus ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरली आहे.
कंपनीने हा निर्णय iPhone 14 Plus च्या सेलचे प्रमाण घेतला आहे, असे सांगितले जात आहे.
Apple ने iPhone 14 सीरीज अंतर्गत 2022 मध्ये चार मॉडेल लॉन्च केले आहेत. या सिरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Plus मॉडेल्सचा समावेश आहे. 2023 वर्षाच्या सुरूवातीस, Apple च्या आगामी नेक्स्ट जनरेशनच्या iPhone 15 सिरीजशी संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे. ताज्या लीक झालेल्या रिपोर्टमध्ये नवीन माहिती समोर आली आहे…
MacRumors च्या मते, Apple कंपनी iPhone 15 सीरीजसाठी 2 प्रकारचे नवीन प्लॅनिंग करत आहे. पहिल्या नियोजनानुसार प्रो आणि नॉन प्रो मॉडेल वेगळे केले जाणार आहेत. दुसऱ्या प्लॅनिंगमध्ये उद्योगाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत असे सांगण्यात आले आहे की, Apple नवीन प्लस मॉडेलची किंमत सध्याच्या प्लस मॉडेलपेक्षा कमी ठेवू शकते. iPhone 14 Plus ची सध्याची किंमत USD 899 म्हणजेच सुमारे 75,000 रुपये आहे. तथापि, iPhone 15 Plus ची किंमत USD 799 म्हणजेच अंदाजे रु. 66,000 पर्यंत कमी केली जाऊ शकते.
रिपोर्टनुसार, कंपनीने हा प्लॅन iPhone 14 Plus च्या सेलचे प्रमाण पाहून बनवला आहे. Apple कंपनी अजूनही या वर्षी iPhone 14 Plus च्या विक्रीसाठी संघर्ष करत आहे. ही iPhone सीरीजची नवीन आवृत्ती आहे, जी ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरली आहे.
iPhone 15 Plus अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
Apple या फोन मध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डायनॅमिक आयलंड देऊ शकते. तसेच, फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले मिळू शकतो. याशिवाय या फोनशी संबंधित जास्त माहिती समोर आलेली नाही. फोन लॉन्च व्हायला अजून 1 पूर्ण वर्ष बाकी आहे. अशा परिस्थितीत, आशा केली जाऊ शकते की आगामी काळात कंपनी या फोनशी संबंधित इतर माहिती देखील उघड करेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.