जर तुमच्या लक्षात असेल की InFocus ने आपला विजन 3 स्मार्टफोन मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये एका नव्या डिजाईन आणि नव्या प्रकारच्या डिस्प्ले सह लॉन्च केला होता. आता समोर येत आहे की कंपनी या स्मार्टफोन चा एक इम्प्रूव्ड वर्जन लवकरच लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातून या डिवाइस च्या बाबतीत एक टीजर पण जारी केला आहे.
हा स्मार्टफोन Infocus Vision 3 Pro नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण याच्या स्पेक्स बद्दल अजुन तरी जास्त माहिती समोर आली नाही पण 91 मोबाईल्स नुसार हा डिवाइस 18 एप्रिलला सादर केला जाऊ शकतो. या नवीन डिवाइस बद्दल आलेल्या काही बातम्यां नुसार 4GB ची रॅम आणि 64GB इन्टरनल स्टोरेज असू शकते.
या स्मार्टफोन चे काही स्पेक्स पाहता IANS च्या एक रिपोर्ट म्हणते की हा स्मार्टफोन 13-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल च्या ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल. तसेच असेही समोर येत आहे की यात एक 13-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण असू शकतो.
असे पण समोर येत आहे की हा डिवाइस याच्या लॉन्च सोबतच सेल साठी पण उपलब्ध केला जाईल आणि किंमत Rs 10,000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. जर Infocus Vision 3 स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस कंपनी कडून 5.7-इंचाच्या HD+ डिस्प्ले सह येऊ शकतो ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे.
या डिवाइस मध्ये 2GB रॅम, 16GB स्टोरेज आणि मीडियाटेक MTK6737 क्वाड कोर प्रोसेसर आहे ज्याचा क्लॉक स्पीड 1.3GHz आहे. याची स्टोरेज 64 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते तसेच हा डिवाइस एंड्राइड 7.0 वर चालतो. हा डिवाइस 4G VoLTE ला सपोर्ट करतो.
ऑप्टिक्स पाहता हा डिवाइस डुअल रियर कॅमेरा सेटअप ऑफर करतो. Infocus Vision 3 च्या बॅक वर 13+5 मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा आहे. याचा 13MP चा कॅमेरा ऑटो जूमिंग लेंस आहे आणि 5MP चा कॅमेरा 120 वाइड एंगल लेंस आहे आणि याचा रियर कॅमेरा बोकेह आणि PIP मोड ऑफर करतो. याच्या फ्रंट ला 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. याच्या फ्रंट कॅमेरा मध्ये बॅकग्राउंड ब्लर एडवांस फीचर आहे.
या डिवाइस मध्ये 4000 mAh ची बॅटरी आहे. सेंसर बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट, ग्रॅविटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रोक्सिमिटी सेंसर आहेत.