मोबाईल निर्माता कंपनी इनफोकसने बाजारात आपला एक नवीन स्मार्टफोन S1 लाँच केला आहे. सध्यातरी ह्या फोनला चीनमध्ये लाँच केले गेले आहे. ह्या फोनची किंमत 999 Yuan (जवळपास 10,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. ह्या फोनसाठी १२ जूनपासून प्री-बुकिंग सुरु केली जाऊ शकते आणि 13 जूनपासून हा ओपन सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा एक IPS डिस्प्ले आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये 1.8GHz ऑक्टा-कोर हेलिओ P10 मिडियाटेक MT6755M प्रोसेसर आणि 4GB रॅम दिली आहे. हा डिवाइस टेंसेंट ऑपरेटिंग सिस्टम 2.0 वर काम करतो, जो अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर आधारित आहे.
हेदेखील वाचा – २०,००० च्या किंमतीत येणारे आकर्षक स्मार्टफोन्स (मे २०१६)
13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा हे ह्या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य आहे. फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो. फोन 2900mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आले आहे. जो फोनच्या मागील बाजूस देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये 2G/3G, वायफाय, GPS/AGPS, ब्लूटुथ आणि मायक्रो-USB 2.0 पोर्टसुद्धा दिले गेले आहेत. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा 4G ला सुद्धा सपोर्ट करतो. हा फोन सोनेरी रंगात सुद्धा मिळेल. ह्याचा आकार 153.5×76.1×7.9mm आणि वजन १५२ ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – सोनी एक्सपीरिया X, XA किंमत असेल अनुक्रमे ४८,९९० रु. आणि २०,९९० रुपये
हेदेखील वाचा – आता व्हॉट्सअॅपवरुनही ट्रान्सफर करता येणार पैसे…!!