मोबाईल निर्माता कंपनी इनफोकसने आपला नवीन स्मार्टफोन M808 लाँच केला आहे, ज्याची किंमत१२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनला एक्सक्लूसिव्हली ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडीलवरुन खरेदी करु शकता. इनफोकस M808 स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
इनफोकस M808 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो. इनफोकस M808 थोडा वक्र डिझाईनसह येतो. हा मेटॅलिक अॅल्युमिनियम यूनीबॉडीने बनला आहे. फोनची जाडी 7.56mm आहे, ह्यात 2450mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ, वायफाय आणि GPS उपलब्ध आहे. हा फोन 4G LTE तंत्रज्ञानाने बनला आहे. आणि ह्यात ड्यूल सिम स्लॉट दिला गेला आहे. दोन्ही सिम 4G आहेत.
स्नेपडील पर Rs.12,999 में इनफोकस M808 खरीदें