US चा स्मार्टफोन निर्माता कंपनी इनफोकसने आपला नवीन स्मार्टफोन इनफोकस M535 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत कंपनीद्वारा ९,९९९ रुपये ठरविण्यात आली आहे. हा संपुर्ण मेटल यूनीबॉडीने बनविण्यात आला आहे. हा २ नोव्हेंबरपासून स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर,ह्यात ५.५ इंचाची HD स्क्रीन दिली गेली आहे. ह्यात ६४-बिट मिडियाटेक MT6735 क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेला आहे., जो 1.5GHz वेग देतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये २जीबीची रॅम दिली गेली आहे आणि स्मार्टफोनमध्ये १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने ६४जीबीपर्यंत वाढवू शकतो.
फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा जो आपल्याला ऑटो-फोकस आणि फ्लॅशसह दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा ऑटो-फोकससह दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 4G सपोर्टसह बाजारात आणला आहे आणि हा अॅनड्रॉईड ५.१ वर चालतो. हा स्मार्टफोन गोल्ड आणि सिल्व्हर अशा रंगात उपलब्ध आहे.
याआधी कंपनीने स्मार्टफोन M260 लाँच केला होता. हा एक 3G स्मार्टफोन आहे,ज्याची किंमत ३,९९९ रुपये आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्या हँडसेटच्या विक्रीसाठी पुढील दोन-तीन आठवड्यात रजिस्ट्रेशन सुरु करणार आहे. आणि हा फक्त ई-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलवर मिळेल.
हा नवीनतम अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. इनफोकस एम260 स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपच्या युआय लाइफ 2.0 स्किनचा समावेश आहे.