ह्यात १.३GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि १जीबीची रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन 8GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
मोबाईल निर्माता कंपनी इनफोकसने भारतात आपला नवीन स्मार्टफोन M260 लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ३,९९९ रुपये ठेवली आहे. हा कंपनीचा पहिली मेड इन इंडिया स्मार्टफोन आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ४.५ इंचाची FWVGA डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz मिडियाटेक MT6582M क्वाड-कोर चिपसेट आणि १जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. इनफोकस एम२६० मध्ये २०००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात ड्युल-सिम ड्युल स्टँडबाय, 3G, 2G, वायफाय, ब्लूटुथ 4.0 आणि एफएम रेडियो कनेक्टिव्हीटी दिली आहे. हा स्मार्टफोन नारिंगी, पिवळा आणि पांढ-या अशा तीन रंगात उपलब्ध होईल.
हा नवीनतम अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. इनफोकस एम260 स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपच्या वर युआय लाइफ २.० स्किन देण्यात आली आहे,