Infinix ने आपला नवीन स्मार्टफोन Infinix Zero Ultra 5G जागतिक बाजारात लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 180 W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे, जो 12 मिनिटांत फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज करतो. फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात 5 GB व्हर्च्युअल रॅम देखील आहे, जी तिची एकूण रॅम 13 GB पर्यंत वाढवते. फोनची किंमत $520 म्हणजेच जवळपास 42,400 रुपये आहे.
हे सुद्धा वाचा : रिलायन्स JIO कडून 'या' 4 शहरांमध्ये 5G ची बीटा ट्रायल सुरू, 'या' वापरकर्त्यांची मज्जाच मजा
फोनमध्ये, कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.8-इंच फुल HD + 3D कर्व AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 900 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. Infinix चा हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. यामध्ये कंपनी 5 जीबी व्हर्चुअल रॅम देखील देत आहे. या फोनमध्ये MediaTek Helio 920 चिपसेट देण्यात आला आहे.
त्याबरोबरच, यामध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 180W थंडर चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, ही टेक्नॉलॉजी 12 मिनिटांत फोनची बॅटरी शून्य ते 100% चार्ज करते. हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर काम करतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे आहेत. यामध्ये 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 200-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससह 2-मेगापिक्सेलचा सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.