प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix च्या नव्या आणि आगामी Infinix Zero Flip स्मार्टफोनच्या लाँचसाठी सज्ज झाली आहे. अखेर कंपनीने या फोनची लाँच डेट देखील जाहीर केली आहे. त्याबरोबरच, इ-कॉमर्स साईट Flipkart वर यासाठी एक मायक्रो वेबसाईट देखील सुरु केली गेली आहे. या मायक्रो वेबसाइटवरून फोनचे काही स्पेसिफिकेशन्सदेखील समोर आले आहेत. त्यावरून समजून येते की, Samsung, Tecno आणि OnePlus सोबत Infinix देखील आपला नवीन फ्लिप फोन घेऊन येत आहे. जाणून घेऊयात Infinix Zero Flip चे लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: Price Cut! Vivo Y28s फोनच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत आणि सर्व तपशील
आगामी Infinix Zero Flip फोन भारतीय बाजारात 17 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. हे लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातील. फोनच्या टीझरने पुष्टी केली आहे की, कंपनीचा हा फ्लिप फोन Infinix AI फीचर्ससह सादर केला जाईल. फोनची किंमत आणि नेमके फीचर्स 17 ऑक्टोबरला लॉन्चिंग दरम्यानच पुढे येतील.
वर सांगितल्याप्रमाणे, Infinix Zero Flip फोनचे काही स्पेक्स उघड झाले आहेत. हा फोन GoPro मोडला सपोर्ट करेल. नुकतेच लाँच झालेल्या Infinix Zero 40 5G मध्ये देखील हे फिचर आहे. मायक्रो वेबसाइटवरून फोनचे इतर फीचर्स समोर आलेले नाहीत. मात्र, स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे.
फोनच्या ग्लोबल वेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.9 इंच लांबीचा pOLED Full HD+ फुल एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 3.64 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. या फ्लिप स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आहे. तसेच, हा फोन 32MP सेल्फी कॅमेरासह येतो. पॉवर बॅकअपसाठी यात 70W अल्ट्रा वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 4720mAh बॅटरी देण्यात आली आहे.