प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने अलीकडेच म्हणजेच मागील आठवड्यात भारतात आपला नवा फ्लिप स्मार्टफोन Infinix Zero Flip 5G लाँच केला आहे. त्यानंतर, आज या स्मार्टफोनची पहिली सेल भारतीय बाजारात सुरु होणार आहे. या फोनची पहिली सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान Infinix Zero Flip 5G फोनवर भारी ऑफर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Infinix Zero Flip 5G फोनची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Infinix Zero Flip 5G फोन भारतात एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 8GB+512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास ग्राहकांना 10% झटपट सूट मिळेल. हा फोन ब्लॉसम ग्लो आणि रॉक ब्लॅक कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. येथून खरेदी करा
Infinix Zero Flip 5G मध्ये 6.9-इंच लांबीचा FHD+ LTPO OLED मुख्य डिस्प्ले आहे, ज्याचा 120Hz रिफ्रेश दर आहे. डिस्प्लेचा रिझोल्युशन 1080 x 2640 पिक्सेल आणि 1,400 nits ची कमाल ब्राइटनेस आहे. तर, 120Hz रिफ्रेश रेटसह 3.64-इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले तुमच्या कॅमेऱ्यासाठी व्ह्यूफाइंडर आणि YouTube, WhatsApp सारख्या ॲप्समध्ये प्रवेश करण्यासाठी शॉर्टकट म्हणून काम करेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हे उपकरण MediaTek Dimensity 8020 SoC द्वारे 8GB RAM आणि 512GB UFS 3.1 स्टोरेजसह समर्थित आहे.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS सह 50MP प्राथमिक सेन्सर आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. तसेच, आतील डिस्प्लेमध्ये 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह 50MP सेल्फी कॅमेरा आहे. इतर फीचर्समध्ये AI व्लॉग मोड, JBL द्वारे ट्यून केलेले स्टिरिओ स्पीकर आणि हाय-रेस ऑडिओ सपोर्ट यांचा समावेश आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोन 70W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,720 mAh बॅटरी पॅक करतो. Zero Flip फोनला दोन वर्षांचे Android OS अपडेट्स आणि तीन वर्षांचे नियमित सुरक्षा पॅच मिळण्याची पुष्टी देखील झाली आहे.
डिस्क्लेमर: आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.