प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix चा लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Zero 40 5G जागतिक स्तरावर गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये लाँच केला होता. त्यानंतर, आता हा स्मार्टफोन भारतात लाँच होण्यास सज्ज झाला आहे. होय, Infinix Zero 40 5G फोनची लाँच तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अप्रतिम AI फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Infinix Zero 40 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Infinix Zero 40 5G स्मार्टफोन येत्या 18 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय बाजारात लाँच होईल, असे मीडिया रिपोर्ट्सद्वारे समोर आले आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. मीडिया वृत्तानुसार, हा स्मार्टफोन Xiaomi, Vivo, Oppo आणि Realme सारख्या ब्रँडच्या मोबाईल फोनशी जबरदस्त स्पर्धा करेल. Infinix ने अद्याप Zero 40 5G च्या किंमतीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. मात्र, लीकनुसार फोनची किंमत 19 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते.
Infinix Zero 40 5G फोन आधीच जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, या डिव्हाइसमध्ये 6.74 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश दर 144Hz असेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Helio G100 प्रोसेसर देण्यात आला आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi, ड्युअल सिम स्लॉट, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 108MP मेन लेन्ससह, 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. जी 45W फास्ट चार्जिंग आणि 20W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे. हा मोबाइल फोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
Infinix Zero 40 मध्ये AI इरेजर उपलब्ध आहे. ज्याद्वारे फोटोच्या पार्श्वभूमीतून नको असलेला कंटेंट रिमूव्ह केला जाऊ शकतो. याशिवाय, AI कट-आउट स्टिकर, AI व्लॉग आणि AI इमेज जनरेटर सारख्या फीचर्सचे देखील फोनमध्ये सपोर्ट आहे.