Infinix Zero 30 5G Sale Offers: पहिल्या सेलमध्ये येतोय Infinix चा लेटेस्ट स्मार्टफोन, ऑफरसह स्वस्तात खरेदी करा

Infinix Zero 30 5G Sale Offers: पहिल्या सेलमध्ये येतोय Infinix चा लेटेस्ट स्मार्टफोन, ऑफरसह स्वस्तात खरेदी करा
HIGHLIGHTS

आज Infinix Zero 30 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Axis Bank क्रेडिट कार्ड असल्यास फोनच्या खरेदीवर 2000 रुपये इतकी सूट

अतिशय मजबूत चार्जिंग सपोर्टसह फोन फक्त 30 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होईल.

अलीकडेच Infinix ने Infinix Zero 30 5G भारतात लाँच करण्यात आला होता. आता आज Infinix Zero 30 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन काही पॉवरफुल फीचर्ससह एक दमदार स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या सेलमध्ये या स्मार्टफोनवर भारी ऑफर्सदेखील मिळत आहेत. बघुयात ऑफर्स 

Infinix Zero 30 5G ची किंमत 

फोन सध्या Flipkart वर गोल्डन अवर आणि रोम ग्रीन कलर पर्यायांमध्ये 12PM पासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. Infinix Zero 30 5G स्मार्टफोन भारतात दोन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे. Infinix Zero 30 5G स्मार्टफोनचे बेस मॉडेल 8GB रॅमसह 23,999 रुपये किमतीत सादर करण्यात आले आहे. तर, स्मार्टफोनचे 12GB रॅम मॉडेल 256GB स्टोरेजसह फक्त 24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

infinix zero 30 5g

पहिल्या सेलमधील ऑफर्स 

पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोनवर विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तुमच्याकडे Axis Bank क्रेडिट कार्ड असल्यास तुम्ही फोनच्या कोणत्याही मॉडेलच्या खरेदीवर 2000 रुपये इतकी सूट मिळवू शकता. याबरोबर, जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून नवीन फोन खरेदी केला तर तुम्ही सुमारे 23,050 रुपये वाचवू शकता. याशिवाय, तुम्ही नो कॉस्ट EMI ऑप्शन्ससह देखील हा फोन खरेदी करू शकता.

Infinix Zero 30 5G

 Infinix Zero 30 5G फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा डिस्प्ले उपलब्ध आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येते. याशिवाय फोनमध्ये Dimensity 8020 प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. डायमेंसिटी 8020 हा एक अतिशय चांगला चिपसेट आहे, जो अभूतपूर्व कामगिरीसह येतो जो गेमिंगच्या दृष्टीने खूपच प्रभावी आहे. Infinix Zero 30 5G स्मार्टफोन Android 13 वर सादर करण्यात आला आहे, याशिवाय यात XOS 13 चा लेयर आहे. 

जर आपण Infinix Zero 30 5G कॅमेरा पाहिला तर हा स्मार्टफोन 108MP कॅमेराने सुसज्ज आहे. उत्तम रिझोल्यूशन हे सुनिश्चित करते की प्रतिमा मोठ्या किंवा क्रॉप केल्या तरीही कॉलिटी टिकवून ठेवते. फोनमध्ये 13MP वाइड अँगल कॅमेरा देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये आणखी 2MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. हा सेल्फी कॅमेरा अधिक माहिती कॅप्चर करेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, अतिशय मजबूत चार्जिंग सपोर्टसह फोन फक्त 30 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo