Infinix ने अलीकडेच आपला GT 10 Pro स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. त्यानंतर, आता कंपनी Zero सीरीजचा नवीन स्मार्टफोन Infinix Zero 30 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत कंपनीने आगामी स्मार्टफोनच्या अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही, परंतु हा आगामी फोन फ्लिपकार्ट द्वारे 2 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल.
Infinix Zero 30 5G च्या प्री-ऑर्डर सुरू होण्याआधीच, त्याची मायक्रो-साइट Flipkart वर लाइव्ह झाली आहे. मायक्रोसाईटद्वारे या हँडसेटची मुख्य फीचर्स उघड झाली आहेत. चला तर मग जास्त वे न घालवता आगामी स्मार्टफोनबद्दल जरा अधिक माहिती घेऊयात.
या फोनमध्ये एक कर्व AMOLED डिस्प्ले दिला जाईल, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन उपलब्ध असेल. हे 6.78-इंच 10-बिट पॅनेल असेल जे 360Hz टच सॅम्पलिंग रेटला समर्थन देईल. यासह, कंपनीने पुष्टी केली आहे की, त्याला 950 nits पीक ब्राइटनेस आणि 100% DCI-P3 कलर गॅमट मिळेल.
कंपनीने मायक्रो-साइटद्वारे पुष्टी केली आहे की, Infinix Zero 30 5G रोम ग्रीन आणि गोल्डन अवरसह दोन कलर पर्यायांमध्ये येईल. याचे रोम ग्रीन व्हेरियंट व्हेगन लेदर फिनिशसह येईल. तर, गोल्डन अवर कलर व्हेरियंटमध्ये मागील बाजूस एक ग्लास पॅनेल उपलब्ध असेल. ई-कॉमर्स सूचीनुसार, Infinix Zero 30 5G ची जाडी सुमारे 7.99mm असेल.
हा फोन OIS सपोर्टसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज असेल. हे क्लोज-अप शॉट्स घेण्यासाठी किंवा प्रतिमा क्रॉप करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, चांगल्या प्रकाशाच्या परिस्थितीत 50 MP कॅमेरा वापरणे महत्त्वाचे आहे. हा फोन 4K 60fps रेकॉर्डिंग पर्यायासह 50MP फ्रंट कॅमेरा देईल.
पुढील आठवड्यात अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे. Infinix येत्या काही दिवसांत Zero 30 5G च्या कॅमेरा क्षमतांबद्दल अधिक तपशील सादर करू शकते.