Infinix ने मध्यम श्रेणीच्या किमतीत एक नवीनतम स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. लेटेस्ट स्मार्टफोन झिरो सिरीजमध्ये जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे Infinix Zero 30 5G मध्ये तुम्हाला तब्बल 50MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तर, 21GB विस्तारित रॅम टेक्नॉलॉजी देखील आहे. या स्मार्टफोनचे संपूर्ण फीचर्स आणि किंमत पुढे सविस्तर वाचा.
Infinix Zero 30 5G फोन भारतात दोन मेमरी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. फोनच्या बेस मॉडेलची किंमत 23,999 रुपये आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅमसह 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. टॉप व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे.
या फोनसह तुम्हाला सूट देखील मिळणार आहे. बँक ऑफर अंतर्गत, या दोन्ही व्हेरिएंटवर 2 हजारांची सूट देखील उपलब्ध आहे. Infinix Zero 30 5G रोम ग्रीन आणि गोल्डन अवर रंगांमध्ये खरेदी करता येईल. त्याबरोबरच फोनचा लेदरचा पर्यायही बाजारात उपलब्ध आहे.
Infinix Zero 30 5G नवीनतम स्मार्टफोन 6.7 इंच फुल HD + डिस्प्ले सपोर्टसह येतो. हा डिस्प्ले 120Hz रीफ्रेश रेटसह येतो. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर इमर्सिव, सिनेमॅटिक अनुभव शोधत असाल तर तुम्हाला किमान फुल HD+ सह फोन डिस्प्ले हवा असेल. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. हा मोबाइल फोन पॉवर बॅकअपसाठी 5,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. ते जलद चार्ज करण्यासाठी, मोबाइल फोन 68W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ही बॅटरी बेसिक कार्यांसह दोन दिवस टिकू शकते.
हा फोन Android 13 आधारित XOS 13 वर लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रोसेसिंगसाठी 2.6 GHz क्लॉक स्पीडसह MediaTek Dimension 8020 octacore प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. डायमेंसिटी 8020 हा एक अतिशय चांगला चिपसेट आहे. जो अभूतपूर्व कामगिरीसह येतो, जो गेमिंगच्या दृष्टीने खूपच प्रभावी आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन Mali-G77 GPU ला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी हा मोबाईल ट्रिपल रिअर कॅमेरा सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 108-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. हा कॅमेरा प्रत्येक शॉटमध्ये ट्रू-टू-लाइफ तपशील कॅप्चर करतो आणि झूम इन किंवा क्रॉप केल्यावरही तुमची पिक्चर शार्प ठेवतो. जो 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि तिसरा AI सेन्सर यांच्या संयोगाने काम करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, Infinix Zero 30 5G स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे सुनिश्चित करते की, इमेजेस मोठ्या केल्या किंवा क्रॉप केल्या तरीही कॉलिटी टिकून राहील.