Infinix Smart 8HD स्मार्टफोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी झाली आहे. नावाप्रमाणेच, हा फोन Infinix Smart 7HD चा सक्सेसर असणार आहे, जो या वर्षी एप्रिलमध्ये लाँच करण्यात आला होता. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असेल. लाँचपूर्वी कंपनीने फोनचे काही फीचर्स देखील उघड केले आहेत. यामध्ये क्रिस्टल ग्रीन, शायनी गोल्ड, टिंबर ब्लॅक आणि गॅलेक्सी व्हाईट असे चार कलर ऑप्शन्स दिले जातील.
हे सुद्धा वाचा: Good News! Samsung Galaxy F14 5G फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News
Infinix Smart 8HD स्मार्टफोन भारतात 8 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करून फोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने फोनची काही फीचर्स देखील उघड केली आहेत. यासोबतच फोनचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये Infinix Smart 8 HD चे डिझाईन दिसत आहे.
Infinix Smart 8HD च्या पुष्टी केलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असेल. फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले मिळेल. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz असेल आणि त्याची कमाल 500 Nits ब्राइटनेस असेल. तसेच, यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट देण्यात येईल.
या बजेट फोनच्या 2GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 रुपये आहे. या फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह आहे. याशिवाय, हा फोन ऑक्टा-कोर स्प्रेडट्रम SC9863A1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात 13MP कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5,000mAh आहे, ज्यामध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.