digit zero1 awards

Infinix Smart 8 HD बजेट स्मार्टफोनची पहिली Sale Flipkart वर सुरु, कमी किमतीत मिळतील तगडे फीचर्स। Tech News 

Infinix Smart 8 HD बजेट स्मार्टफोनची पहिली Sale Flipkart वर सुरु, कमी किमतीत मिळतील तगडे फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Infinix Smart 8 HD भारतीय बाजारात 8 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आला.

ग्राहकांना Axis Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 630 रुपयांपर्यंत सूट

एक प्रमुख फिचर म्हणजे डायनॅमिक नॉच फिचर होय, जे मॅजिक रिंग म्हणून ओळखले जाते.

Infinix ने आपला नवीनतम स्मार्टफोन Infinix Smart 8 HD भारतीय बाजारात 8 डिसेंबर रोजी लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सेल आजपासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन मॅजिक रिंग लाइट फीचरसह येतो. यामध्ये अशा काही फीचर्सचा समावेश आहे जे तुम्हाला या किंमतीत इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही. म्हणूनच हा फोन बाजारातील इतर बजेट स्मार्टफोन्सना जबरदस्त स्पर्धा देईल, असे म्हटले जाते. चला तर मग जास्त वेळ न घालवता फोनवरील उपलब्ध ऑफर्स बघुयात.

Infinix smart 8 HD sale Offers

Infinix Smart 8 HD ची किंमत आणि ऑफर्स

Infinix च्या Infinix Smart 8 HD स्मार्टफोनची किमंत 6,299 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये लॉन्च ऑफर अंतर्गत, ग्राहकांना Axis Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 630 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यानंतर त्याची किंमत 5,669 रुपये होईल. हा स्मार्टफोन आजपासून फ्लिपकार्टवर क्रिस्टल ग्रीन, शायनी गोल्ड आणि टिंबर ब्लॅक या कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Infinix Smart 8 HD

Infinix Smart 8 HD sale today

हा फोन 6.6 इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेमध्ये एक प्रमुख फिचर म्हणजे डायनॅमिक नॉच फिचर होय, जे मॅजिक रिंग म्हणून ओळखले जाते. हे फिचर स्क्रीनच्या शीर्षस्थानी फेस अनलॉक, बॅकग्राउंड कॉल, चार्जिंग ऍनिमेशन, चार्जिंग पूर्ण झाल्याचे रिमाइंडर आणि लो बॅटरी रिमाइंडर इ. नोटिफिकेशन्स दर्शवेल.

हा हँडसेट Unisoc T606 प्रोसेसरसह 6GB पर्यंत RAM आणि 64GB स्टोरेजसह सुसज्ज आहे. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हे डिवाइस Android 13 Go सॉफ्टवेअरवर चालेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13MP ड्युअल AI कॅमेरा आणि क्वाड-LED रिंग फ्लॅशसह एक प्रभावी कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय, समोर 8MP सेल्फी कॅमेरा आणि LED फ्लॅशचा समावेश आहे. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo