Infinix Smart 8HD बजेट स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, कमी किमतीत मिळेल iPhone चा लोकप्रिय फिचर। Tech News 

Infinix Smart 8HD बजेट स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, कमी किमतीत मिळेल iPhone चा लोकप्रिय फिचर। Tech News 
HIGHLIGHTS

Infinix चा Infinix smart 8HD फोन भारतात लाँच

Infinix smart 8HD फोनची किंमत केवळ 5,669 रुपये आहे.

हा स्मार्टफोन 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध शॉपिंग साईट Flipkart वर उपलब्ध होणार

Infinix ने आपला नवा Infinix smart 8HD फोन भारतात बजेट विभागात लाँच केला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये LCD स्क्रीन आणि डायनॅमिक आयलंड सारखी डायनॅमिक नॉच फीचर मॅजिक रिंग असेल. तसेच, यात फोटोग्राफीसाठी AI लेन्स देण्यात आली आहे. हा फोन इतर कंपन्यांच्या स्वस्त स्मार्टफोन्सशी स्पर्धा करणार असल्याचे बोलले जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात Infinix Smart 8 HD ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: चॅटमध्ये वैयक्तिक मॅसेज डिलीट करायला विसरलात? काळजी करू नका, WhatsApp वर आले नवे Best फिचर! Tech News

Infinix Smart 8HD ची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Infinix ने नवा Infinix Smart 8HD स्मार्टफोन बजेट विभागात लाँच केला आहे. या फोनची किंमत केवळ 5,669 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध शॉपिंग साईट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन Crystal Green, Shiny Gold आणि Timber Black कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Infinix Smart 8 HD dynamic island

Infinix Smart 8HD चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Smart 8HD मध्ये 6.6-इंच लांबीचा HD Plus IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन Unisoc T606 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यासह 6GB RAM आणि 128GB स्टोरेजदेखील जोडण्यात आले आहेत. फोनचे इंटरनल स्टोरेज SD कार्डच्या मदतीने वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Infinix ने या फोनमध्ये LED लाइटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये पहिला 13MP प्रायमरी सेन्सर आहे आणि दुसरा AI लेन्स आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. विशेष म्हणजेच यामध्ये पोर्ट्रेट आणि नाईट असे मोड देखील देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, यात 5000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये ऑडिओ जॅक, पॉवरफुल स्पीकर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo