Infinix Smart 8 फोन नवा Affordable स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

Updated on 08-Jan-2024
HIGHLIGHTS

Infinix Smart 8 स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म झाली आहे.

मायक्रोसाइटनुसार Infinix Smart 8 ची किंमत 6,XXX रुपये असेल.

Infinix Smart 8 फोनला या सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश फोनचा टॅग देण्यात आला आहे.

Infinix Smart 8 स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म झाली आहे. हा कंपनीचा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असेल, जो कंपनी 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑफर करेल. या फोनसाठी डेडीकेटेड मायक्रोसाइट कंपनीच्या साइटवर लाइव्ह झाली आहे. या मायक्रोसाइटच्या माध्यमातून फोनच्या लाँच डेटसोबतच फोनच्या अनेक प्रमुख फीचर्सची माहितीही समोर आली आहे. चला तर मग आगामी बजेट स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती बघुयात-

हे सुद्धा वाचा: भारीच की! Popular Samsung Galaxy S23 आणि S23+ फोन झाले कायमचे स्वस्त, किंमत तब्बल 10,000 रुपयांनी कमी। Tech News

Infinix Smart 8 भारतीय लाँच

Infinix Smart 8 फोन भारतात 13 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. Infinix Smart 8 स्मार्टफोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट कंपनीच्या साइटवर लाइव्ह झाली आहे. या साईटच्या माध्यमातून फोनच्या लाँच डेटचा खुलासा करण्यात आला आहे. केवळ लाँच डेटच नाही तर या साइटच्या माध्यमातून लाँचपूर्वी फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनचा तपशीलही समोर आला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, मायक्रोसाइटनुसार Infinix Smart 8 ची किंमत 6,XXX रुपये असेल, असे दिसून येते. त्यामुळे, कंपनी हा फोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत देऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Infinix Smart 8 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मायक्रोसाईटनुसार केवळ फीचर्सच नाही तर फोनची पहिली झलकही या साइटवर दिसत आहे. फोनच्या मागील बाजूस एक स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यामध्ये LED फ्लॅशला स्थान देण्यात आले आहे. समोरच्या सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच-होल कटआउट असेल, जो आयफोनच्या डायनॅमिक आयलंड म्हणून काम करेल. या कॅप्सूल आकाराच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये चार्जिंग स्थिती, फोन लॉक-अनलॉक चिन्ह आणि कॉलिंग टाइमलाइन यांसारखी माहिती प्रदर्शित केली जाईल. मायक्रोसाइटनुसार Infinix Smart 8 फोनला या सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश फोनचा टॅग देखील देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, Infinix Smart 8 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी कॅमेरा असेल. तर, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा असेल. तर, फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 64GB स्टोरेज मिळणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :