Infinix Smart 8 Plus ची इंडिया लाँच डेट कन्फर्म! 7000 रुपयांहून कमी किमतीत मिळेल अप्रतिम स्मार्टफोन।Tech News

Updated on 28-Feb-2024
HIGHLIGHTS

नवा बजेट स्मार्टफोन Infinix Smart 8 Plus भारतात लाँच होण्यास सज्ज

Infinix Smart 8 Plus भारतात 1 मार्च रोजी लाँच होईल.

Flipkart वर या उपकरणासाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील तयार केली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. आगामी Infinix Smart 8 Plus मार्चमध्ये भारतात लाँच करण्यात येईल. कंपनीने Flipkart वर या आगामी उपकरणासाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील तयार केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन कंपनी बजेट सेक्शनमध्ये सादर करणार आहे. एवढेच नाही तर, हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आला होता. चला तर मग बघुयात Infinix Smart 8 Plus स्मार्टफोनचे लॉन्चिंग डिटेल्स-

हे सुद्धा वाचा: Absolutely Lowest! Reliance Jio घेऊन येतेय सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, 2G आणि 3G ची झाली सुट्टी? Tech News

Infinix Smart 8 Plus ची लाँच डेट

Flipkart वरील कंपनीच्या मायक्रोसाइटनुसार, Infinix Smart 8 Plus भारतात 1 मार्च रोजी लाँच होईल. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु या फोनची किंमत 7000 रुपयांच्या खाली असेल, अशी मायक्रोसाइटद्वारे पुष्टी झालेली आहे. त्याबरोबरच, हा स्मार्टफोन Flipkart द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Infinix Smart 8 Plus Features

Infinix Smart 8 Plus चे तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन काही निवडक बाजारपेठांमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा IPS फुल-HD LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि समोर 8MP सेल्फी कॅमेरा समाविष्ट आहे.

एवढेच नाही तर, पॉवर बॅकअपसाठी या डिव्हाइसमध्ये 6000mAh बॅटरी असणार आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. बॅटरी एका चार्जवर 47 तासांचा टॉकटाइम, 90 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम आणि 45 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, मायक्रोसाइटनुसार हा Infinix फोन MediaTek Helio G36 चिपसेटसह सुसज्ज असेल. जो 4GB रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह जोडला जाईल. त्याबरोबरच, रॅम अक्षरशः 8GB पर्यंत वाढवता येते तर, स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :