नवीन Affordable स्मार्टफोन Infinix Smart 8 लवकरच भारतात होणार लाँच, कंपनीने केले कन्फर्म! Tech News

Updated on 28-Dec-2023
HIGHLIGHTS

Infinix Smart 8 बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा

हा स्मार्टफोन जानेवारी 2024 मध्ये देशात लाँच होण्याची शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे हे उपकरण खूपच कमी किमतीत येण्याची शक्यता आहे.

Infinix ने Infinix Smart 8 बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये आधीच लाँच झाला आहे. त्याचप्रमाणे, याआधी नुकतेच Smart 8 HD स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले गेले. विशेष बाब म्हणजे हे उपकरण खूपच कमी किमतीत येण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे लॉन्चिंग डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्ससह सर्व अपडेट्स-

हे सुद्धा वाचा: Jio ने वाढवले ​​Airtel-VI चे टेन्शन! फक्त 148 रुपयांमध्ये संपूर्ण महिन्यासाठी तब्बल 12 OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News

Infinix Smart 8 भारतीय लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, Infinix ने पुष्टी केली आहे की Infinix Smart 8 लवकरच भारतात लाँच होईल. हा स्मार्टफोन जानेवारी 2024 मध्ये देशात लाँच होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या लाँचची तारीख काही दिवसात ब्रँडद्वारे उघड केली जाऊ शकते.

Infinix Smart 8

एवढेच नाही तर, नुकतेच असे सांगण्यात आले आहे की कंपनी भारतात फोनची एक विशेष आवृत्ती लाँच करणार आहे, ज्यामध्ये टिंबर टेक्सचर बॅक पॅनल असेल. यासोबतच एकूण तीन कलर ऑप्शन्स देखील देण्यात येणार आहेत. हा स्मार्टफोन आधीच ग्लोबली लाँच झाला आहे, मात्र भारतीय मॉडेलच्या स्पेसिफिकेशन्समध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

Infinix Smart 8 चे अपेक्षित तपशील

ग्लोबल व्हेरिएंटनुसार, Infinix Smart 8 मध्ये 6.6-इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz रिफ्रेश रेट इतका आहे. तसेच, यात उत्कृष्ट मॅजिक रिंग फिचर देखील मिळेल, यासह तुम्ही डिस्प्ले नॉचवर महत्त्वाच्या सूचना पाहू शकता. उत्तम परफॉर्मन्ससाठी कंपनीने या डिवाइसमध्ये Unisoc T606 चिप बसवली आहे. डिव्हाइसमध्ये 4GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनची इंटर्नल स्टोरेज मायक्रो SD कार्ड स्लॉटद्वारे वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी, Infinix Smart 8 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि AI सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी 8MP लेन्स उपलब्ध आहे. सेल्फीचे शौकीन असलेल्या युजर्ससाठी हा फ्रंट कॅमेरा उत्तम ठरतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा डिव्हाइस 5000mAh बॅटरी आणि USB टाइप C चार्जिंगसह येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :