लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Smart 8 ची आज पहिली Sale आज, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स। Tech News 

लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Smart 8 ची आज पहिली Sale आज, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

बजेट स्मार्टफोन Infinix Smart 8 नुकताच भारतात लाँच

Infinix Smart 8 स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपये इतकी आहे.

स्मार्टफोनमध्ये मिड-रेंज प्रोसेसर आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी आहे.

आणखी एक बजेट स्मार्टफोन Infinix Smart 8 नुकताच भारतात लाँच झाला. आज म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी या डिवाइसची पहिली सेल आहे. हा सेल ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होईल. या फोनवर उत्तम ऑफर्स उपलब्ध असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्मार्टफोनमध्ये मिड-रेंज प्रोसेसर आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी आहे. यामुळे या रेंजमधील इतर लोकप्रिय स्मार्टफोन्सना थेट स्पर्धा मिळणार, असे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा: Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये प्रीमियम फोन मोठ्या Discountसह खरेदी करा, बघा संपूर्ण यादी। Tech News

Infinix Smart 8 किंमत आणि ऑफर

Infinix Smart 8 स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 10% सूट उपलब्ध आहे. Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक दिला जात आहे. हा फोन 264 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल. हा फोन Rainbow Blue, Shiny Gold, Timber Black आणि Galaxy White कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

infinix smart 8

Infinix Smart 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Smart 8 मध्ये 500 nits च्या शिखर ब्राइटनेससह 6.6-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G36 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे, जी 2TB पर्यंत वाढवता येईल. यामध्ये व्हर्च्युअल रॅमचाही सपोर्ट आहे. हा मोबाइल फोन Android 13 आधारित XOS 13 वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी कंपनीने Smart 8 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात AI लेन्ससह 50MP कॅमेरा समाविष्ट आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय, फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, 4G LET, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, GPS, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo