digit zero1 awards

भारीच की ! Infinix Smart 7 वर प्रचंड सवलत, जाणून घ्या किमंत आणि फीचर्स

भारीच की ! Infinix Smart 7 वर प्रचंड सवलत, जाणून घ्या किमंत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

Flipkart Axis Bank कार्डने या Infinix फोनच्या खरेदीवर 5% कॅशबॅक मिळणार आहे.

Infinix Smart 7 Unisoc Spreadtrum SC9863A1 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

मोठी 6000mAh बॅटरी याला आणखी खास बनवते.

Infinix Smart 7 नुकताच भारतात लाँच करण्यात आला आणि आता बजेट फोनची विक्री देखील सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. हा डिवाइस फक्त 4GB RAM + 64GB स्टोरेज मध्ये आला आहे, ज्याची किंमत 7,299 रुपये आहे. बघुयात या स्मार्टफोनवरील ऑफर्स… 

हे सुद्धा वाचा : OTT This Week : मनोरंजनाचा जबरदस्त डोस, OTT वर रिलीज होणार 'या' सिरीज आणि चित्रपट

INFINIX SMART 7 वर फ्लिपकार्ट ऑफर

  Infinix चा हा फोन Flipkart Axis Bank कार्डने खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळणार आहे. इतकंच नाही तर एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी केल्यास 6,750 चा बोनस डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. या डिस्काउंटद्वारे तुम्हाला एक नवीन Infinix फोन 549 रुपयांमध्ये मिळेल. 

INFINIX SMART 7 चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Smart 7 स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला Unisoc Spreadtrum SC9863A1 प्रोसेसर मिळतो आणि तो 4GB RAM सह देखील जोडलेला आहे, जो अतिरिक्त व्हर्च्युअल RAM द्वारे 3GB पर्यंत वाढवता येतो. Infinix Smart 7 मध्ये तुम्हाला Android 12 OS चा सपोर्ट मिळतो. फोन 64GB स्टोरेज आणि 2TB पर्यंत विस्तारण्यायोग्य मेमरीसह येतो.

फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP सेल्फी शूटर आहे. ज्यामध्ये AI लेन्स आणि समोरील बाजूस LED फ्लॅश आहे. Infinix Smart 7 मध्ये जलद चार्जिंग सपोर्टशिवाय 6000mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo