आकर्षक लुकसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, किमंत फक्त 5,399 रुपये

Updated on 28-Apr-2023
HIGHLIGHTS

Infinix SMART 7HD स्मार्टफोन भारतात लाँच

या स्मार्टफोनची किंमत एकूण 5,399 रुपये आहे.

बॅटरीबाबत तब्बल 50 तासांच्या बॅटरी लाईफचा दावा

बजेट सेगमेंटच्या स्मार्टफोन्सच्या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे. Infinix ने नवीन फोन Infinix SMART 7HD लाँच केला आहे. यापूर्वी Infinix SMART 7HD जागतिक स्तरावर लाँच झाला होता. तर, आता हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनसह तुम्हाला प्रीमियम डिझाईन मिळेल. तसेच, स्वस्तात तुम्हाला उत्तम स्टोरेज देखील मिळणार आहे. 

Infinix SMART 7HD ची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे Infinix SMART 7HD बजेट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत एकूण 5,399 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, सिल्क ब्लू, जेड व्हाइट आणि ग्रीन ऍप्पल कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix SMART 7HD मध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले मिळणार आहे. Infinix SMART 7HD ला 2GB LPDDR4X RAM सोबत 2GB व्हर्च्युअल रॅम मिळेल. यासह, फोनमध्ये 64 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध असणार आहे. त्याबरोबरच, यात Android 12 Go आधारित XOS 12 ऑक्टाकोर AI प्रोसेसरसह उपलब्ध आहे. यात फिंगर प्रिंट सॅन्ड्रा आणि फेस अनलॉक फिचरदेखील मिळणार आहे. 

Infinix SMART 7HD मध्ये 8-मेगापिक्सेलचा ड्युअल AI रिअर कॅमेरा आहे. कॅमेरासोबत ड्युअल LED फ्लॅशलाइटही उपलब्ध आहे. तसेच, 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही मिळणार आहे. फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, त्यासोबत पॉवर सेविंग मोड देखील मिळणार आहे. बॅटरीबाबत तब्बल 50 तासांच्या बॅटरी लाईफचा दावा करण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :