Infinix चा नवा बजेट स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, किती असेल किंमत ?
Infinix Smart 7 HD लवकर भारतात होणार दाखल
आगामी स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच होणार
स्मार्टफोनची लाँच डेट आणि काही फीचर्स कंपनीकडून कन्फर्म
Infinix नेहमीच ग्राहकांच्या बजेटमध्ये येणारे नवीनतम आणि बजेट स्मार्टफोन आणतो. बजेट विभागात येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये लवकरच आणखी एक नाव सामील होणार आहे, तो म्हणजे कंपनीचा आगामी स्मार्टफोन Infinix Smart 7 HD हा होय. हा स्मार्टफोन मागील वर्षी लाँच झालेल्या Infinix Smart 6 HD चा अपग्रेडेड वर्जन असेल. या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट आणि काही फीचर्स कंपनीकडून कन्फर्म करण्यात आले आहेत.
Infinix Smart 7 HD लाँच डेट आणि अपेक्षित किंमत
कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन 28 एप्रिल 2023 रोजी भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन बजेट किमतीत लाँच केला जाणार आहे, असे पुढे आले आहे. वृत्तानुसार या फोनची किंमत 7 ते 8 हजार रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे.
Infinix Smart 7 HD संभावित स्पेक्स
आगामी स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6-इंच लांबीची मोठी स्क्रीन पाहायला मिळणार आहे. नावावरून हे समजून येते की, हा नवीनतम फोन HD रिझोल्यूशनसह येईल. कंपनीने सांगितले की, फोन 4GB पर्यंत रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसरबद्दल अद्याप माहिती पुढे आलेली नाही.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा कुठला असेल आणि किती मेगापिक्सेलचे कॅमेरा सेन्सर दिले जातील, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. डिवाइसमध्ये ग्राहकांना 5000mAh ची जबरदस्त बॅटरी मिळणार आहे.
Infinix Smart 6 HD ची किमंत
Infinix Smart 6 HD स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला होता. भारतात हा फोन एकाच 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 6,799 रुपये ठेवण्यात आली होती
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile