Infinix smart 7 Launched: बजेट स्मार्टफोनचा नवीन 128GB स्टोरेज व्हेरिएंट सादर, बघा किंमत

Infinix smart 7 Launched: बजेट स्मार्टफोनचा नवीन 128GB स्टोरेज व्हेरिएंट सादर, बघा किंमत
HIGHLIGHTS

अखेर आता फोनचा नवा व्हेरिएंट भारतात दाखल झाला आहे.

फोनच्या नवीन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे.

HDFC बँक कार्डद्वारे फोनवर 4000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल.

Infinix Smart 7 स्मार्टफोन भारतात फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी हा डिवाइस सिंगल 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता. पण मागील काही दिवसांत लवकरच भारतात फोनचा नवीन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच होण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर, अखेर आता फोनचा नवा व्हेरिएंट भारतात दाखल झाला आहे. हा फोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर सूचीबद्ध आहे. बघुयात फोनची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सशी संबंधित सर्व माहिती- 

 Infinix Smart 7 नव्या व्हेरिएंटची किमंत आणि ऑफर्स

कंपनीने Infinix Smart 7 स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट फ्लिपकार्टवर सूचिबद्ध केला आहे. फोनच्या नवीन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास HDFC बँक कार्डद्वारे फोनवर 4000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. याशिवाय, हा फोन 282 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर देखील खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही हा फोन नाईट ब्लॅक, एमराल्ड ग्रीन आणि अझर ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. 

 Infinix Smart 7 चे तपशील 

Infinix Smart 7 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा IPS LCD HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1612×720 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश दर 60Hz आहे. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 500 nits ब्राइटनेस मिळेल. IPS LCD खूप चांगले  रिप्रॉडक्शन, बेटर व्युइंग अँगल, उत्तम ब्राइटनेस लेव्हल देते. 

याशिवाय, फोन Unisoc SC9863A1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. इंटरनेट गतीच्या बाबतीत, हे अनुक्रमे 300Mbps आणि 100MBps डाउनलोड आणि अपलोड स्पीड देते. ज्यामध्ये 4GB रॅम आणि आता 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनची रॅम अक्षरशः 3GB पर्यंत वाढवता येते.तर , मायक्रो SD कार्ड स्लॉटद्वारे स्टोरेज देखील वाढवता येणार आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 13MP प्राथमिक आणि 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. 13MP कॅमेरा बहुतेक प्रकरणांमध्ये फोनसाठी पुरेसा उच्च-गुणवत्तेचा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह वॉटरड्रॉप नॉच उपलब्ध आहे. 5MP हायर पिक्सेल काउंट आणि उत्कृष्ट इमेज कॉलिटी देते. 

फोनची बॅटरी 6000mAh आहे, त्याचसोबत 10W फास्टिंग सपोर्ट दिला गेला आहे. 6000mAh बॅटरी असलेला मोबाईल हेवी युज आणि गेमर्ससाठी चांगले काम करतो. तसेच, युजर इंटेन्स गेमिंग किंवा सतत स्ट्रीमिंग दरम्यान डिव्हाइसला अनेक वेळा चार्ज करण्यापासून ते त्रासमुक्त राहतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये रेअर माँराटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले गेले. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये डुअल-सिम, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप-सीिंग आणि जीपीएस सपोर्ट आहे. फोनमध्ये अँटी-बॅक्टेरियल बॅक पॅनेल देखील आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo