Infinix Smart 7 स्मार्टफोन भारतात लाँच, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत
Infinix Smart 7 मध्ये 6000mAh बॅटरी आहे.
Infinix स्मार्टफोन भारतात 7,299 रुपयांना लाँच
त्याची विक्री पुढील आठवड्यात सुरू होईल.
Infinix ने आणखी एक बजेट स्मार्टफोन लाँच भारतात लाँच केला आहे. होय, Infinix Smart 7 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. डिव्हाइस सिंगल रॅम आणि स्टोरेज वेरिएंटसह येतो. कंपनीने याला अनेक कलर पर्यायांमध्ये लाँच केले आहे. हा डिवाइस कंपनीने 7,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या…
हे सुद्धा वाचा : Jioचे 'हा' प्लॅन करेल तुमची मोठी बचत, कमी किमतीत सर्व काही अनलिमिटेड
Infinix Smart 7
या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1612 x 720, रिफ्रेश रेट 60Hz, टच सॅम्पलिंग रेट 120Hz आणि 500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने ते 2TB पर्यंत वाढवता येते. डिव्हाइस 3GB विस्तारित रॅम पर्यायासह देखील येतो. हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर चालतो.
या व्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, जी या श्रेणीतील फोनमध्ये मिळणाऱ्या बॅटरी पॅकच्या तुलनेत खूप जास्त आहे. हँडसेट Unisoc Spreadtrum SC9863A प्रोसेसरसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, या नवीन फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, USB -टाइप C पोर्ट, ड्युअल 4G VoLTE आणि ब्लूटूथ 4.2 आहे.
किंमत :
हा Infinix स्मार्टफोन भारतात 7,299 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. यात 4GB रॅमसह 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. हँडसेट Azure Blue, Emerald Green आणि Night Black या तीन कलर ऑप्शन्समध्ये आणण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile