5000mAh बॅटरी आणि अप्रतिम फीचर्ससह Infinix चा नवा फोन आज होणार लाँच, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी

5000mAh बॅटरी आणि अप्रतिम फीचर्ससह Infinix चा नवा फोन आज होणार लाँच, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Infinix Smart 6 Plus फोन आज होणार लाँच

फोन इ-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर लाँच होणार आहे.

नवीन फोनची किंमत अंदाजे 10,000 रुपयांपेक्षा कमी

Infinix स्मार्ट सिरीजमधील नवीन फोन लाँच करून त्यांचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीचा Smart 6 Plus फोन आज 29 जुलैला लाँचसाठी तयार आहे. हा फोन आज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लाँच  होणार आहे. लिस्टिंग पेजने डिस्प्ले आणि कॅमेरा फिचरसह हँडसेटबद्दल अनेक तपशील उघड केले आहेत, चला या फोनमध्ये नवीन काय येत आहे ते जाणून घेऊयात… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! 300 रुपयांखालील जिओ टॉप 3 प्लॅन, डेटा, कॉलिंगसह मिळतील अनेक बेनिफिट्स

Infinix Smart 6 Plus चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

याशिवाय, सूचीवरून असे दिसून आले की, डिव्हाइस 6.82-इंच HD+ रिझोल्यूशन डिस्प्लेसह येईल. Infinix Smart 6 Plus मध्ये 6GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 5,000mAh बॅटरी असेल. मायक्रोसाइटवरील टीझर पोस्टर हे देखील उघड करते की, डिव्हाइसमध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन असेल.

infinix smart 6

Infinix Smart 6 Plus ची अपेक्षित किंमत

स्मार्टफोनच्या प्रोसेसर आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, कन्फर्म फीचर्सच्या आधारे, Infinix Smart 6 सारखाच हा फोनदेखील कमी किमतीचा फोन असेल. नवीन फोनची  किंमत अंदाजे 10,000 रुपयांपेक्षा कमी असावी.

Infinix Smart 6 किंमत

Infinix Smart 6 ची किंमत 7,499 रुपये आहे. हा फोन भारतात हार्ट ऑफ ओशन, लाइट सी ग्रीन, पोलर ब्लॅक आणि स्टाररी पर्पल कलरमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Infinix Smart 6 मध्ये 6.6-इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसरसह Android 11 (Go Edition) आधारित XOS 7.6 आहे. फोनसोबत 4 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज उपलब्ध असेल. 4GB RAM मध्ये 2GB व्हर्च्युअल रॅम देखील समाविष्ट आहे. फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध असेल. या फोनच्या बॅक पॅनलवर बॅक्टेरियाचा परिणाम होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo