Reveal! लाँचपूर्वीच Infinix Note 50x 5G ची किंमत उघड, टॉप ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सना मिळेल जबरदस्त टक्कर 

Reveal! लाँचपूर्वीच Infinix Note 50x 5G ची किंमत उघड, टॉप ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सना मिळेल जबरदस्त टक्कर 
HIGHLIGHTS

Infinix चा नवीन स्मार्टफोन Infinix Note 50x 5G लवकरच भारतात लाँच होणार

Infinix Note 50x 5G फोन 27 मार्च 2025 रोजी भारतात लाँच केला जाईल.

लाँचपूर्वीच आगामी फोनची अपेक्षित किंमत उघड करण्यात आली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix चा नवीन स्मार्टफोन Infinix Note 50x 5G लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीने प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे फोनची लाँच डेट कन्फर्म केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 27 मार्च 2025 रोजी भारतात हा फोन लाँच केला जाईल. हे डिव्हाइस शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सूचीबद्ध करण्यात आले आहे. या फोनचे अनेक फीचर्स देखील समोर आले आहेत. या फोनबद्दल अनेक माहिती ऑनलाईन उघड होत आहे. अशातच, आता आगामी डिव्हाइसची किंमत देखील उघड झाली आहे. जाणून घेऊयात Infinix Note 50x 5G ची अपेक्षित किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Leaked! Vivo X200 Ultra मध्ये मिळेल Powerful कॅमेरा सेटअप, इतर जबरदस्त फोन्सना देईल का टक्कर?

Infinix Note 50x 5G

Infinix Note 50x 5G अपेक्षित किंमत

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वरील सक्रिय मायक्रो-साइटनुसार Infinix Note 50x 5G स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात येऊ शकते. Infinix Note 50x 5G हे मध्यम श्रेणीतील Xiaomi, Vivo आणि Realme सारख्या ब्रँडच्या मोबाईल फोनशी स्पर्धा करेल. मात्र, लक्षात घ्या की, या फोनची खरी किंमत लॉन्चिंग इव्हेंटनंतरच पुढे येईल.

Infinix Note 50x 5G चे अपेक्षित तपशील

Infinix Note 50x 5G फोनच्या अपेक्षित तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, या इन्फिनिक्स स्मार्टफोनमध्ये AI फीचर्ससह XOS 15 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. त्यात डायनॅमिक बार देखील उपलब्ध असेल, जो Apple च्या डायनॅमिक आयलंडप्रमाणे कार्य करतो. सुरळीत कामकाजासाठी, स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्टिमेट चिप देण्यात आली आहे. या फोनमध्ये तुम्हाला लॅग-फ्री गेमिंग अनुभव मिळेल.

तर फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसमध्ये 50MP कॅमेरा उपलब्ध असेल, ज्याद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येऊ शकते. या फोनला IP64 रेटिंग देखील मिळाले आहे. एवढेच नाही तर, पॉवर बॅकअपसाठी Infinix Note 50x 5G फोनमध्ये 5500mAh ची पॉवरफुल बॅटरी असेल, जी 45W फास्ट चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट असेल. कंपनीचा दावा आहे की, या फोनची बॅटरी जास्त काळ टिकेल अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. Infinix Note 50x 5G फोन सी ब्रीझ ग्रीन, एन्चँटेड पर्पल आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शन्समध्ये मिळू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo