Infinix Note 50x 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix चा लेटेस्ट फोन Infinix Note 50x 5G भारतात लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे MediaTek Dimensity 7300 Ultimate चिपसह येणारे हे जगातील पहिले उपकरण आहे. हा फोन कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. नवीन डिव्हाइसमध्ये फास्ट चार्जिंगसह मोठी 5500mAh बॅटरी, Folax AI व्हॉइस असिस्टंट आणि लेखन दस्तऐवज-कॉल असिस्ट सारखी अनेक AI फीचर्स आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊया Infinix Note 50x 5G ची किंमत आणि फीचर्स-
Also Read: Oppo F29 5G First Sale: लेटेस्ट स्मार्टफोनसह करा अंडरवॉटर फोटोग्राफी, पहिल्या सेलमध्ये आकर्षक ऑफर्स
Infinix Note 50x 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. नव्या फोनच्या 6GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. तर, त्याचे 8GB+ 128GB स्टोरेज मॉडेल 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 3 एप्रिलपासून Flipkart वर लाईव्ह असणार आहे. हा फोन सी ब्रीझ, एन्चँटेड पर्पल आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
Infinix Note 50x 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. विशेष म्हणजे या फोनला स्मार्ट बनवण्यासाठी Folax AI व्हॉइस असिस्टंटसह रायटिंग डॉक्युमेंट-कॉल असिस्ट आणि ऑब्जेक्ट इरेजर, IR ब्लास्टर सारखे नवीनतम फीचर्स प्रदान केले गेले आहेत. त्याला IP64 रेटिंग मिळाले आहे, याद्वारे पाणी आणि धुळीपासून हा फोन खराब होणार नाही.
वर सांगितल्याप्रमाणे, उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्टिमेट प्रोसेसर दिला आहे. चांगल्या आवाजासाठी, फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत, जे DTS ध्वनीने सुसज्ज आहेत. फोटोग्राफीसाठी, Infinix Note 50x मध्ये LED फ्लॅश लाईटसह 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा आहे. एवढेच नाही तर, या फोनद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो. यात 45W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरी आहे.