प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने Infinix Note 50x 5G अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला होता. दरम्यान, या फोनची पहिली सेल भारतात आज म्हणजेच 3 एप्रिल रोजी सुरु होत आहे. ही सेल दुपारी 12 वाजल्यापासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर लाईव्ह होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान, या कालावधीत बँकेकडून स्मार्टफोनवर सवलत आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल. हँडसेटमध्ये जबरदस्त AI फीचर्स देखील प्रदान करण्यात आली आहेत. जाणून घेऊयात Infinix Note 50x 5G ची किंमत, ऑफर्स आणि स्पेक्स-
Also Read: Xiaomi 15 First Sale: 50MP कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट फोनवर भारी Discount, तब्बल 5000 रुपयांची सूट
Infinix चा नवीन स्मार्टफोन Infinix Note 50x 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 6GB+ 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 11,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, त्याचा 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपयांना खरेदी करता येईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये या फोनवर 1000 रुपयांची बँक सूट मिळणार आहे. तसेच, परवडणारा EMI देखील दिला जात आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Infinix Note 50x 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमधील AI फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये फोलॅक्स AI व्हॉइस असिस्टंट, रायटिंग डॉक्युमेंट-कॉल असिस्ट आणि ऑब्जेक्ट इरेजर सारख्या फीचर्सचा समावेश आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्टिमेट चिप आहे. या फोनला IP64 रेटिंग देखील मिळाले आहे. तसेच, फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाच्या डॉक्युमेंट्ससाठी या फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी, या Infinix Note 50X फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी या फोनच्या पुढील बाजूस 8MP चा कॅमेरा आहे. याद्वारे वापरकर्ते 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. अखंड कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.