Infinix ने आपल्या नोट 40 सीरीजचा विस्तार केला आहे. या सिरीज आणखी एक नाव आणि स्मार्टफोन जोडला आहे, म्हणजेच Infinix Note 40X 5G फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे. हा फोन प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. जाणून घेऊयात Infinix Note 40X 5G ची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: जबरदस्त फीचर्ससह Samsung Galaxy F14 फोन भारतात दाखल, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी
Infinix ने नवीन Infinix स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. फोनच्या बेस मॉडेल 8GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त 14,999 रुपये आहे. तर, 12GB RAM + 256GB स्टोरेज सह Infinix Note 40X 5G च्या टॉप मॉडेलची किंमत 15,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन लाइम ग्रीन, पाम ब्लू आणि स्टार लाइट ब्लॅक अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix Note 40X 5G फोनची विक्री 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:00 वाजता Flipkart वर सुरू होईल. तर, लाँच ऑफर अंतर्गत SBI आणि HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1500 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. एवढेच नाही तर, 6 महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील मिळणार आहे.
Infinix Note 40X 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा FHD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट, डायनॅमिक बार इंटरएक्टिव्ह UI आणि पंच होल डिझाइन मिळणार आहे.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट उपलब्ध आहे. ही चिपसेट दैनंदिन कार्ये, स्मूथ मल्टीटास्किंग आणि मध्यम गेमिंगसाठी कार्यक्षम कार्यप्रदर्शन प्रदान करते.
Infinix Note 40X 5G फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे. यात मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील आहे, ज्याच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.
Infinix Note 40X 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. यात AI तंत्रज्ञान आणि क्वाड LED फ्लॅशसह 108MP प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि AI लेन्स आहे. यामध्ये यूजर्सना ड्युअल व्हिडिओ, फिल्म मोड, प्रो मोड असे अनेक पर्याय मिळतात. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.
डिवाइस मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनीचा दावा आहे की, फोनद्वारे 15 तासांपर्यंत व्हिडिओ, 90 तास संगीत, 16 तास कॉलिंग इ. करता येईल.