Infinix Note 40X 5G ची आज पहिली Sale आजपासून भारतात सुरु, मिळेल भारी Discount आणि ऑफर्स 

Infinix Note 40X 5G ची आज पहिली Sale आजपासून भारतात सुरु, मिळेल भारी Discount आणि ऑफर्स 
HIGHLIGHTS

Infinix Note 40X 5G ची भारतात पहिली विक्री सुरु

Infinix Note 40X 5G भारतात दोन व्हेरिएंटसह भारतात सादर करण्यात आला आहे.

ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास Infinix Note 40X 5G वर 1500 रुपयांपर्यंत सूट

Infinix ने Infinix Note 40X 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, Infinix Note 40X 5G स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून सुरू होणार आहे. या पहिल्या सेलमध्ये हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची सेल ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart च्या माध्यमातून केली जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फोनची किंमत, सेल ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर पहिल्यांदाच प्रचंड Discount उपलब्ध, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

 Infinix Note 40X 5G ची भारतात पहिली विक्री सुरु

Infinix Note 40x 5G पहिली सेल

Infinix Note 40x 5G स्मार्टफोनची विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनचे दोन व्हेरिएंट सादर केले गेले आहेत. फोनचा 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सह बेस व्हेरिएंट 14,999 रुपयांना आणला गेला आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम सह येतो, ज्याची किंमत 15,999 रुपये आहे. या सेलदरम्यान, तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. एवढेच नाही तर, लाँच ऑफरअंतर्गत तुम्ही हा 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फोन खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Infinix Note 40x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 40x 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनच्या स्क्रीनवर डायनॅमिक पोर्ट देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये चार्जिंग, कमी बॅटरी आणि फेस अनलॉक सारखी माहिती प्रदर्शित केली जाईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

Infinix Note 40x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 108MP मेन कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये पॉवरसाठी 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी दिली गेली आहे. या फोनच्या मागील बाजूस क्वाड LED फ्लॅश देखील मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo